बुजदिल राक्षस… पहलगाम हल्ल्यानंतर अखेर 20 दिवसांनी अमिताभ बच्चन यांनी सोडलं मौन, कवितेतून व्यक्त केला संताप

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. देशभरातून या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आणि पाकिस्तानला कायमची अद्दल घडवण्याची मागणी करण्यात आला. या हल्ल्यावर अनेक सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया दिल्या होत्या, मात्र नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असणारे महानायक अमिताभ बच्चन यांनी मौन बाळगले होते. आता तब्बल 20 दिवसानंतर अमिताभ बच्चन यांनी मौन सोडले असून पहलगाम हल्ल्यासह ‘ऑपरेशन सिंदूर’वरही प्रतिक्रिया दिली आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यापासून अमिताभ बच्चन यांनी एक्स (आधीचे ट्विटर) अकाऊंटवर अनेक पोस्ट केल्या होत्या. मात्र या पोस्टमध्ये फक्त नंबर लिहिलेले होते. त्यासोबत एक शब्दही लिहिण्यात आलेला नव्हता. पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर, पाकिस्तानने केलेला ड्रोन-मिसाईल हल्ला यावर अमिताभ बच्चन यांनी चकार शब्दही काढला नव्हता. मात्र आता त्यांनी यावर एक पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी बाबू जी अर्थात हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेच्या काही ओळींचाही उल्लेख केला आहे.

यापुढे दहशतवादी हल्ला झाल्यास युद्ध समजून उत्तर देणार, हिंदुस्थान सरकारचा पाकिस्तानला कडक इशारा

अमिताभ बच्चन यांनी पहलगाम हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्याचा उल्लेख केला आहे. सुट्टीवर असलेल्या निष्पाप जोडप्याला राक्षसाने बाहेर ओढले, पतीला नग्न करून धर्म विचारला आणि गोळीबार केला. पत्नीने गुडघे टेकून विनवणी करूनही तिच्या पतीला मारण्यात आले. भित्र्या राक्षसाने तिच्या पतीवर निर्घृणपणे गोळी मारली आणि पत्नीला विधवा बनवले. जेव्हा पत्नी म्हणाली, मलाही मारून टाक, तेव्हा राक्षस म्हणाला, तू मोदींना जाऊन सांग. अशा या मुलीच्या मनस्थितीवर बाबूजींच्या एका कवितेतील ओळी आठवतात. जणून काही ती मुलगी मोदींकडे गेली आणि म्हणाली, ‘चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे’.. (बाबूजींच्या ओळी)… यानंतर … त्याने तिला सिंदूर दिले. ऑपरेशन सिंदूर!!

जय हिन्द जय हिन्द की सेना
तू ना थमें गा कभी, तू न मुड़ेगा कभी, तू न झुकेगा कभी
कर शपथ, कर शपथ, कर शपथ
अग्निपथ! अग्निपथ ! अग्निपथ।

अवघ्या तीन तासांत पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, लष्कराला फ्री हॅण्ड; सडेतोड उत्तर देण्याचे आदेश

अशी पोस्ट अमिताभ बच्चन यांनी केली आहे. त्यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली असून जवळपास 1 मिलियन लोकांपर्यंत पोहोचली आहे. या पोस्टवर 21 हजार जणांनी लाईक दिला असून 3 हजारांहून अधिक जणांनी रिट्विट केले आहे. तर 2 अडीच हजारांहून अधिक युजर्सने यावर कमेंट केली आहे.