बिग बी फिट, मंगळवारपासून सेटवर

818

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना शुक्रवारी सायंकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांना रुटीन चेक अपसाठी रुग्णालयात गेल्यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी त्यांच्या चाहत्यांत मोठी चिंता होती.

आता सोनी एंटरटेन्मेंट वाहिनीवरील लोकप्रिय ‘कौन बनेगा करोडपती’ मालिकेचे काय होणार असा प्रश्नही चाहत्यांना पडला होता, पण नानावटी रुग्णालयातील वैद्यकीय तपासणीत अमिताभ पूर्णपणे फिट असल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या मंगळवारपासून ते पुन्हा ‘कौन बनेगा करोडपती’च्या पुढच्या भागांच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहेत. नियमित वैद्यकीय चाचणीसाठीच बिग बी मुंबईच्या नानावटी रुग्णालयात गेले होते. सध्या ते रुग्णालयात नाहीत आणि पूर्णपणे तंदुरुस्त असल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या