अमिताभ बच्चन नानावटी रुग्णालयात दाखल

1350
amitabh-bachchan

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडल्याने गेल्या तीन दिवसांपासून ते नानावटी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांचा यकृताचा त्रास वाढला असून मंगळवारी रात्री दोनच्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अमिताभ यांनी अलीकडेच स्वतःच्या प्रकृतीबाबत माहिती देताना माझे यकृत 75 टक्के खराब झाले असून केवळ 25 टक्केच काम करतेय, असे सांगितले होते. 1982 मध्ये ‘कुली’ चित्रपटादरम्यान झालेल्या दुखापतीपासून त्यांना यकृताचा त्रास सुरू आहे. नानावटी रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या सर्व सुविधा असलेल्या स्पेशल रूममध्ये त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या