महिलेने विचारला ‘असा’ प्रश्न… अमिताभ बच्चन यांची बोलती झाली बंद!

3716
amitabh-bachchan

बिग बी अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाइतकीच निवेदनशैलीही लोकप्रिय आहे. कौन बनेगा करोडपती या गाजलेल्या टीव्ही शोमध्ये बिग बी त्यांच्या खास शैलीत स्पर्धकाशी गप्पा मारतात. पण, कधी कधी त्या गप्पांच्या नादात त्यांची बोलती बंद व्हायची पाळी येते. असाच काहीसा प्रकार एका महिला स्पर्धकाच्या बाबतीत झाला आहे.

शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या केबीसीच्या भागात डॉ. उर्मिल धतरवाल नावाच्या महिला स्पर्धक सहभागी झाल्या होत्या. त्यांनी लाखो रुपये तर जिंकलेच पण प्रेक्षकांचंही चांगलंच मनोरंजन केलं. त्या 2000 सालापासून केबीसीमध्ये येऊ इच्छित होत्या. पण त्यांना 2019मध्ये अखेर संधी मिळाली आणि त्या हॉट सीटवर येऊन बसल्या. त्यांनी या प्रश्नोत्तरावेळी अमिताभ यांना असंख्य प्रश्न विचारले. त्यात एक प्रश्न असा होता, ज्याने बिग बींची बोलतीच बंद झाली.

उर्मिल यांनी बिग बींना प्रश्न विचारला की, माझ्या मनात होतं की मी तुम्हाला विचारेन, तुमच्या आईने नेमकं काय खाऊन तुम्हाला जन्म दिला, ज्यामुळे तुम्ही इतके भारी आहात. त्यावर बिग बी गोरेमोरे झाले आणि थोडावेळ काहीही बोलू शकले नाहीत. थोड्यावेळाने त्यांनी उत्तर द्यायचा प्रयत्न केला. माझी आई आता हयात नाही आणि जेव्हा होती तेव्हा मला तिने कधी हे सांगितलंही नाही, की तिने असं काय खाल्लं म्हणून मी असा जन्माला आलो. असं कोण सांगतं आपल्या मुलांना… असं बिग बी म्हणाले. त्यावर हे संभाषण थोडं पुढे वाढलं पण अखेरीस उर्मिल यांनी अमिताभ यांच्या आयुष्य आरोग्याची कामना केली आणि बिग बींनी त्यांचे आभार मानले.

आपली प्रतिक्रिया द्या