अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळेच्या ‘झुंड’चं पोस्टर पाहिलंत का?

‘सैराट’च्या निमित्ताने वास्तवदर्शी कथानकावर चित्रपटातून भाष्य केल्यानंतर ‘झुंड’ या हिंदी चित्रपटातून नागराज बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. त्याच्या या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे.

या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत असणार आहेत. ‘झुंड’ या चित्रपटाच्या निमित्ताने बिग बी एका निवृत्त क्रीडा शिक्षकांच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या पोस्टरमध्ये बिग बी पाठमोरे दिसत आहेत. समोर एक वस्ती दिसत आहे. मंगळवारी या चित्रपटाचा टीझर येत असल्याची पोस्ट नागराज मंजुळे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून केली आहे. या चित्रपटाची कथा, इतर कलाकार तसेच प्रदर्शनाची तारीख अद्याप गुलदस्त्यात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या