‘प्रतिक्षा’ बंगल्यातील 43 वर्षांचा गुलमोहर उन्मळून पडला, बिग बींनी आठवणींचा सडा शिंपला

गेली 43 वर्षे ‘प्रतीक्षा’ बंगल्यातील ज्या गुलमोहराची देखरेख केली, ज्याच्यासोबत सुखदुŠख जगलो, ते झाड नुकत्याच झालेल्या पावसात उन्मळून पडलं असं सांगत झाडाशी निगडीत अनेक आठवणी ’बिग बी’अमिताभ बच्चन यांनी नुकत्याच लिहिलेल्या ब्लॉगमध्ये सांगितल्या आहेत. जणू गुलमोहर उन्मळून पडल्यावर ’बिग बीं’च्या आठवणींचा सडा पसरला. छोट्याशा रोपट्याचे मोठं झाड होणं, त्याच्या छायेखाली झालेला अभिषेक-ऐश्कर्याचा विवाह, त्याच्याचभोवती कुटुंबीयांनी मिळून साजरे केलेला प्रत्येक सण , अशा सर्क आठवणी त्यांनी या ब्लॉगमध्ये जागवल्या.

अमिताभ यांनी लिहिलं, ‘1976 मध्ये आम्ही आमच्या या पहिल्या घरात आलो होतो, तेव्हाच पहिल्या दिवशी तेव्हा हे छोटंसं रोपटं लावलं होतं. अवघ्या काही इंचांचं ते रोपटं होतं. या घराचं नाव प्रतीक्षा असं ठेकलं होतं. वडिलांनीच लिहिलेल्या एका कवितेतील ओळींमधून हे नाव ठेवलं होतं. स्कागत सबके लिए यहाँ पर, नहीं किसी के लिए प्रतीक्षाष्ठ यातून प्रतीक्षा नाव बंगल्याला दिले. याच झाडाच्या अवतीभवती खेळत मुलं लहानाची मोठी झाली. त्यांचे वाढदिवस, सणवार इथेच केले. गुलमोहराच्या गडद नारंगी फुलांसारखा प्रत्येक क्षण बहरत गेला. अभिषेक-ऐश्कर्याचं लग्नसुद्धा याच झाडाजवळ झालं होतं. जेव्हा आई आणि वडिलांचं निधन झालं, तेव्हा प्रार्थनासभेसाठी लोक याच झाडाच्या सावलीखाली उभे होते. होलिकादहन याच झाडाजवळ व्हायचं आणि दिवाळीत लख्ख प्रकाशात त्याच्या फांद्या झगमगून निघायच्या. सत्यनारायणाची पूजा, होमहवन त्याच्या अवतीभवती व्हायचे.

पावसात अचानक एक दिवस गुलमोहर पडला हे सांगताना बिग बींनी लिहिलंय, आज ते सगळ्यापासून दूर आहे. कोणालाच त्रास न देता चुपचाप उन्मळून पडलं’

आपली प्रतिक्रिया द्या