अभिषेकने ‘महानायका’ला लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल

1317

सोशल मीडियावर सक्रीय असणारे बॉलिवूडचे सुपरस्टार, महानायक अमिताभ बच्चन यांनी अभिषेक आणि श्वेताचा बालपणीचा फोटो शेअर केला. यासोबत त्यांनी अभिषेक याच्या हस्ताक्षरातील एक पत्रही शेअर केले. 14 नोव्हेंबरला देशभरात ‘बालदिन’ उत्साहात साजरा करण्यात आला, याच्या दुसऱ्या दिवशी अर्थात 15 नोव्हेंबरला बीग बी यांना पत्राचा आणि श्वेता व अभिषेकचा फोटो शेअर केला.

बीग बी यांनी हे पत्र सोशल मीडियावर पोस्ट करण्यामागचे कारणही सांगितले आहे. चित्रिकरणासाठी दूर गेलो असताना अभिषेकने आपल्या सुंदर हस्ताक्षरामध्ये हे पत्र मला पाठवले होते, असे बिग बी सांगतात. ‘बाबा तुम्ही कसे आहात? आम्हाला तुमची खूप आठवण येते. लवकर घरी या’, असे या पत्रात अभिषेक वडिलांना म्हणतो.

या पत्रासोबत बिग बी यांनी मुलगी श्वेता बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये श्वेता आणि अभिषेक नाईट ड्रेसमध्ये दिसत आहे. फोटोसोबत बिग बी यांनी ‘मुलांची निरागसता आपल्याला ते काय आहे हे बनवण्याचे एक कारण आणि संधी देत असते’, असे कॅप्शन दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या