हाताची घडी… अगदी सहज!

638

बिग बी अमिताभ बच्चन सोशल मीडियावर फारच ऍक्टिव्ह असतात… मग एखाद्या सिनेमाचं प्रमोशन असो किंवा जुन्या आठवणी असो! ते फोटो शेअर करत असतात. यावेळी त्यांनी नातू अगस्त्य नंदा याच्यासोबतचा फोटो शेअर केला असून तो सध्या ट्रेंडमध्ये आहे. यामध्ये अभिषेकदेखील आहे. मुलगा आणि नातवासोबत ’बिग बी’ वेगळ्या अंदाजात दिसत आहेत. फोटोला कॅप्शन देताना त्यांनी लिहिलंय, ’आजोबा, मुलगा, नातू… काही वर्षांपूर्वी… हाताची घडी… ठरवून दिलेली पोझ नाही… बस्स, अचानक झालं…’

अगस्त्य हा अमिताभ यांची मुलगी श्वेता नंदा हिचा मुलगा आहे. अगस्त्यची बहीण नव्या नवेली हीदेखील सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे.

आपली प्रतिक्रिया द्या