
महानायक अमिताभ बच्चन केबीसीच्या सेटवर अनेकदा आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दलचे किस्से शेयर करतात. नुकताच त्यांनी जंजीर या सिनेमात आपली निवड कशी झाली, याबाबतचा गंमतीदार किस्सा सांगितला आहे. विशेष म्हणजे च्युईंगम खाण्यामुळे हा सिनेमा आपल्याला ऑफर झाला होता, असे बिग बी यांनी सांगितले आहे. जंजीर या सिनेमामुळे बिग बी यांना ’अॅंग्री यंग मॅन’ ही ओळख मिळाली. जंजीरपूर्वी त्यांचे अनेक सिनेमे आपटले होते. तरीही सलीम-जावेद यांनी बिग बी यांची या सिनेमासाठी निवड केली होती.
याबाबतचा किस्सा सांगताना बिग बी म्हणाले, खरं तर माझे सिनेमे बॉक्स ऑफीसवर अपयशी ठरत असताना जंजीरमध्ये मुख्य भूमिकेसाठी का विचारतायेत हा प्रश्न मला पडला होता. त्यामुळे त्यामागचे कारण मी जावेद-सलीम यांनी विचारले होते. त्यावर जावेद यांनी मला त्यामागचे कारण सांगितले होते. ’बॉम्बे टू गोवा’ या सिनेमात तुझा च्युईंगम खातानाचा एक सीन होता. त्यात तू च्युईंगम खात उभा असताना काहीजण येऊन तुला मारतात. पण तू पुन्हा उठून उभा राहतोस आणि च्युईंगम चघळू लागतो. तुझा हा सीन पाहिल्यानंतर तू जंजीरसाठी परफेक्ट आहेस, असे आम्हाला वाटले असे कारण जावेद यांनी आपल्याला त्यावेळी दिल्याचे बिग बी यांनी सांगितले.