एका मागोमाग एक सहकलाकार सोडून जात आहेत, अमिताभ यांची विक्रम गोखलेंसाठी भावूक पोस्ट

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने फक्त मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीलाही मोठा धक्का बसला आहे. विक्रम गोखले यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. बॉलिवूडमधील अनेत कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. बिग बी बिग बी अमिताभ बच्चन यांनीही त्यांच्या ब्लॉगमधून विक्रम गोखले यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या रविवारच्या ब्लॉगमधून विक्रम गोखले व तब्बसूम यांना श्रद्धांजली वाहिली.

”सध्याचे दिवस फार उदासीन आहेत. मित्र, सहकलाकार एकामागोमाग एक आपल्याला सोडून जातायत. आपण फक्त ऐकतो, बघतो व प्रार्थना करतो. तब्बसूम, विक्रम गोखले व काही प्रिय जवळच्या व्यक्ती… ते आपल्या आयुष्यात येतात… त्यांच्या वाट्याला आलेली भूमिका निभावतात आणि रंगमंच कायमता रिकामा सोडून निघून जातात. त्यांच्या जाण्याने एकाकी करून जातात” अशा मोजक्या शब्दातील ब्लॉग आज अमिताभ बच्चन यांनी लिहला आहे.

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं शनिवारी प्रदीर्घ आजाराने निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. 26 नोव्हेंबर 2022 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.