गोरेगावमध्ये महानंद डेअरीमध्ये आग, सुदैवाने जीवितहानी नाही

khoka-bhai-satish-bhosale-house-set-on-fire-by-unknown-persons-family-members-beaten-up

बुधवारी गोरेगाव येथील महानंद डेअरीमध्ये अमोनिया गॅस गळतीची झाली. सुमारे रात्री 9:12 वाजता गळती झाल्याचे कळाले त्यानंतर अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली.

सावधगिरी म्हणून, डेअरीच्या विद्युत पुरवठ्याला तत्काळ बंद करण्यात आले. ही गळती रेफ्रिजरेशन युनिटमध्ये झाली होती. आपत्कालीन प्रतिसाद पथकाने 15 ते 16 व्हॉल्व बंद केल्या, जेणेकरून पुढील गळती रोखता येईल. दरम्यान,

अग्निशमन अधिकाऱ्यांनी अमोनियाची गळती थांबवण्यासाठी तीन उच्च दाबाच्या फर्स्ट एड लाईन्स आणि चार मोटर पंपाशी जोडलेली एक लहान नळी वापरली. उरलेला सुमारे 15 ते 20 किलो अमोनिया गॅस सुरक्षितरित्या दुसऱ्या टाकीमध्ये हलवण्यात आला. सुरक्षेच्या कारणास्तव परिसर सील करण्यात आला होता आणि सुदैवाने या घटनेत कुठलीही जिवितहानी झालेली नाही. हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरू आहे.