अमरावतीत वाढले 59 कोरोना रुग्ण, रुग्णसंख्या 1 हजार 59 वर, मृतांचा आकडा 36

देशभरासह अमरावती शहर व जिल्ह्यातही कोरोना विषाणू संक्रमणाचा वेग वाढतच असून बुधवारी अमरावतीतील कोरोना रुग्णसंख्येत ५९ रुग्णांची भर पडून एकूण रुग्णसंख्या १०५९ वर पोहोचली. यासह जिल्ह्यातील अजंनगाव सुर्जी निवासी ४३ वर्षीय कोरोना रुग्णाचा बुधवारी मृत्यू झाल्याने अमरावतीतील कोरोना मृत्यूची संख्या ३६ झाली आहे.

अमरावतीतील बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढत असल्याचे समाधान असले तरी दररोज एक प्रमाणे वाढत असलेल्या मृत्यूसंख्येप्रती चिंता व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी अमरातीत ज्या ५९ रुग्णांची भर पडून रुग्णसंख्या १०५९ पार झाली त्या रुग्णांमध्ये ४१ वर्षीय महिला, कृष्णानगर, १० वर्षीय महिला, कैलासनगर, ५८ वर्षीय पुरूष, यावली शहीद, ६० वर्षीय महिला,राहुलनगर, ६० वर्षीय पुरुष, हनुमान नगर, ५२ वर्षीय महिला,पठाण चौक, ५३ वर्षीय महिला, गावंडे ले आऊट, २४ वर्षीय पुरूष, श्रीनाथवाडी, ०६ वर्षीय पुरूष, श्रीनाथ वाडी, २७ वर्षीय पुरुष, श्रीनाथ वाडी, १९ वर्षीय पुरुष, दसरा मैदान, ४९ वर्षीय पुरुष, कंवरनगर, ७५ वर्षीय पुरुष, राजापेठ, ६५ वर्षीय महिला, दरोगा प्लॉट, ५५ वर्षीय महिला, सिद्धेश्वर गृहनिर्माण सोसायटी, ८० वर्षीय पुरुष, श्रीनाथवाडी, ३७ वर्षीय पुरुष, दरोगा प्लॉट, ३२ वर्षीय पुरुष, दाभा, बडनेरा, ३६ वर्षीय महिला, इतवारी, ४५ वर्षीय पुरूष, ताजनगर, २४ वर्षीय महिला, दरोगा प्लॉट, ४७ वर्षीय पुरूष, खोलापुरीगेट, १७ वर्षीय पुरूष, सिद्धेश्वर सोसायटी, ३४ वर्षीय पुरुष, दरोगा प्लॉट, अमरावती, ५३ वर्षीय महिला, कंवरनगर, ३० वर्षीय पुरूष, मौलापुरा, ६० वर्षीय पुरूष, सक्करसात, शनी देवळाजवळ, ११ वर्षीय महिला, कंवरनगर, ५० वर्षीय पुरुष, कैलासनगर, २८ वर्षीय पुरुष, सेंट्रल जेल परिसर, ५६ वर्षीय पुरुष, अंजनगाव सुर्जी, ५५ वर्षीय पुरुष, कारंजा लाड(वाशिम), ४८ वर्षीय पुरुष, कंवरनगर, ३१ वर्षीय पुरुष, चांगापूर, ३२ वर्षीय पुरुष, टाकळी जहागीर, १४ वर्षीय पुरुष, कैलास नगर, २० वर्षीय पुरुष, प्रभात कॉलनी, २९ वर्षीय पुरुष, कैलास नगर, ३३ वर्षीय महिला, पार्वती नगर(डॉक्टर), ४१ वर्षीय पुरुष, कवरनगर, २२ वर्षीय पुरुष, गुलिस्ता नगर, ५० वर्षीय महिला,खापरी,परतवाडा, ७३ वर्षीय पुरुष,कवर नगर, ५० वर्षीय पुरुष, महेश कॉलनी, ४१ वर्षीय महिला,कवर नगर, ४८ वर्षीय पुरुष,कवर नगर, ४० वर्षीय महिला,कवर नगर, ४२ वर्षीय महिला, मिल चाळ, बडनेरा, २७ वर्षीय महिला, धानोरा, ३८ वर्षीय पुरूष, विजयपथ नगर, सिपना कॉलेज जवळ, २८ वर्षीय पुरूष, महावीर नगर, ३९ वर्षीय पुरुष, भीम नगर, ५० वर्षीय महिला, सम्यक कॉलनी, कैलास नगर, दीड वर्षीय बालक, कैलासनगर, २४ वर्षीय पुरूष, एसआरपीएफ कॅम्प, ७४ वर्षीय महिला, पूर्णानगर, २८ वर्षीय महिला, सराफा बाजार, ४० वर्षीय पुरूष, मधुबन ले आऊट, ४३ वर्षीय पुरूष, अंजनगाव सुर्जी यांचा समावेश असून संबंधीतांना कोविड रुग्णालयात दाखल करुन त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची कोरोना चाचणी करण्याची प्रक्रीया सुरु आहे.

आपली प्रतिक्रिया द्या