भीषण अपघातात अल्टो कारचा चेंदामेंदा, तिघे जागीच ठार तर एक गंभीर जखमी

1344

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यातुन जाणार्‍या राष्ट्रीय महामार्ग 548 वर अल्टो कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहे. अंजनगांव ते परतवाडा रोडवर पांढरी खानपुर येथे भरधाव वेगाने येणार्‍या मारुती अल्टो गाडीच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला. गाडी स्मशानभुमी जवळच्या पुलाच्या कठड्यावर धडकली आणि तिचा चेंदामेंदा झाला.

अंजनगाव सुर्जी येथील गुलजार पुरा येथील रहिवासी सुरेश भीमराव यावले (40) हे आपल्या पत्नीला दवाखान्यात नेण्याकरिता अल्टो कारने नागपूरला मुलासह गेले होते. नागपूर येथील काम आटोपल्यानंतर अंजनगाव सुर्जीकडे येत असतांना पांढरी जवळील पुलाजवळ रात्रीच्या दरम्यान भरधाव येणार्‍या अल्टो कार (क्रमांक एम एच 27 बीई 5872) वरील चालकाचे नियंत्रण सुटले. सदर अल्टो कार पुलावर जाऊन आधळल्याने या भीषण अपघातात सुरेश भिमराव यावले (40), त्यांची पत्नी शीलाताई सुरेश यावले (36) आणि गाडीचा चालक दीपक नामदेव नळकांडे (42) हे तिघे जण जागीच ठार झाले, तर मृतक सुरेश यावले यांचा मुलगा शुभम सुरेश यावले (20) हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचाराकरीता अमरावती येथे दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली.

अपघात इतका भीषण होता की अल्टो कारचा चेंदामेंदा झाला होता. सदर अपघाताची माहिती मिळताच तातडीने अंजनगाव पोलिस घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक जायभाये करीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या