अमरावतीत अभियांत्रिकीच्या तरुणीची आत्महत्या

1811

अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या 23 वर्षीय रूपाली मुंदाने नामक तरूणीने पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी साडे दहा वाजताच्या दरम्यान कॅम्प परिसरात असलेल्या नेक्स्ट लेवल मॉल मध्ये घडली.

रूपाली ही मूळची शिराळा येथील रहिवासी असून ती पोटे अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. अभियांत्रिकीच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर तिने येथील विद्याभारती महाविद्यालयात एमबीएसाठी प्रवेश घेतला होता. सतत नापास होत असल्याने ती तणावात होती. अशातच तिने काल मैत्रिणीच्या घरी कॅम्प परिसरातच मुक्काम ठोकला होता. या ठिकाणावरूनच तिने कॅम्प परिसरात असलेल्या उंच इमारतीची टेहाळणी केली. त्यानंतर रूपाली शनिवारी सकाळी साडेदहा वाजताच्या दरम्यान शेजारी असलेल्या नेक्स्ट लेवल मॉलच्या पाचव्या मजल्यावर चढली. व त्या ठिकाणाहूनच तिने उडी मारून आत्महत्या केली. सयाप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या