अमरावती – मुलाकडून बापाची निर्घृण हत्या

प्रातिनिधिक फोटो

आईला शिवीगाळ करत असताना वडीलांनी रोखले म्हणून पित्याचीच हत्या केल्याची घटना अमरावतीत घडली आहे. गुरुवारी रात्री 8 वाजता शिरजगाव पोलीस ठाण्याअंतर्गत येणार्‍या सालेपूर गावात ही हत्या झाल्याचं वृत्त आहे.

काय झालं नेमकं?

प्राप्त माहितीनुसार सालेपूर गावातील मंगेश गणेश गायकवाड (वय 32) याने त्याची आई नलुबाई गायकवाड (वय 50) हिला शिवीगाळ केली. घराच्या दारात उभा राहून शिवीगाळ करत असताना तिने आपल्याला आई असून अशा प्रकारे शिवीगाळ करण्याबद्दल विचारणा केली.

त्याचवेळी वडील गणेश गायकवाड यांनी मध्ये पडून मंगेशला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चिडलेल्या मंगेशने वडिलांवर चाकूने सपासप वार केले. त्यामुळे वडिलांचा मृत्यू झाला. याबाबत आई नलुबाई हिने शिरजगाव पोलिसात तक्रार दिल्यानंतर मुलाच्या विरोधात 302, 294 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या