आनंद पेडणेकर यांचा सन्मान

ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डॉमेस्टिक काउन्सिलच्या वतीने जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्सचे संचालक आनंद पेडणेकर यांचा सन्मान केला जाणार आहे. हिंदुस्थानातील सर्वाधिक पसंतीचे रिटेलर म्हणून त्यांना गौरवण्यात येणार आहे.

वांद्रे येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 16 ते 19 सप्टेंबर दरम्यान जेम्स अँड ज्वेलरी प्रदर्शन होणार आहे. या प्रदर्शनाचे औचित्य साधून आनंद पेडणेकर यांचा सन्मान करण्यात येणार आहे. एका छोटय़ा कारखान्यापासून सुरू झालेले पेडणेकर ज्वेलर्स हा आता देशातील विश्वासार्ह ज्वेलरी ब्रँड बनला आहे. संस्कृती व परंपरेला नावीन्याची जोड देत हा ब्रँड यशस्वी करण्यात आनंद पेडणेकर यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.