
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आनंदराव नलवडे यांची बिनविरोध निवड झाली. बाजार समितीत सत्ता आल्यानंतर सभापतिपदी पहिल्यांदा काँग्रेस, त्यानंतर दुसऱयांदा राष्ट्रवादीला देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार राष्ट्रवादीला सभापतीपद दिले.
सहकार उपनिबंधक बिपीन मोहिते यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीची सत्ता आहे. निवडणुकीत काँग्रेसचे जास्त संचालक निवडून आल्याने सर्वप्रथम काँग्रेस पक्षाचे संचालक जतचे सुजय शिंदे यांना सभापतिपदाची संधी देण्यात आली होती. शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर हालचाली गतिमान झाल्या होत्या. राष्ट्रवादी दुसऱया क्रमांकावर असल्याने सभापतिपदावर पक्षाने दावा केला. राष्ट्रवादीकडून आनंदराव नलवडे यांची दावेदारी सरस ठरली. आमदार रोहित पाटील गटाचे महेश पवार यांनीही निवडीसाठी प्रयत्न केले.



























































