अंधेरीतील चित्रकूट स्टुडिओला भीषण आग, एकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंधेरी पश्चिमेच्या चित्रकूट स्टुडिओमधील रणबीर कपूरच्या आगामी चित्रपटाच्या सेटला शुक्रवारी सायंकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेत मनीष देवाशी (32) या तरूणाचा मृत्यू झाला असून सेटचे देखील मोठे नुकसान झाले. चित्रकूट स्टुडिओत सेट उभारण्याचे काम सुरू होते. सेटसाठी प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा वापर केल्याने आग झपाटय़ाने पसरली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 हून अधिक गाडय़ा दाखल झाल्या. दरम्यान, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.