आंध्र, एनकेईएस, भावे हायस्कूल उपांत्य फेरीत

श्री उद्यान गणेश मंदिर चषक शालेय कबड्डी स्पर्धेत मुलांमध्ये आंध्र एज्युकेशन हायस्कूल, ताराबाई मोडक हायस्कूल, विनोबा भावे शाळा, एनकेईएस आदी शाळांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुलींच्या गटात ज्ञान विकास, एसआयईएस, डॉ. आंबेडकर, गौरीदत्त मित्तल आदी शालेय संघांनी उपांत्यपूर्व फेरी जिंकली. श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती आयोजित मुलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात आंध्र एज्युकेशन हायस्कूलने श्री गणेश इंग्लिश स्कूलचा 43-26 असा पराभव करतांना सांघिक खेळ विजयी संघाला उपयुक्त ठरला. अन्य मुलांच्या सामन्यात ताराबाई मोडक हायस्कूलने महिला मंडळ संचालित माध्यमिक विद्यालयाचे आव्हान 40-25 असे संपुष्टात आणले. कप्तान स्वराज काशे व वेदांत सकपाळ यांच्या आक्रमक खेळामुळे एनकेईएस हायस्कूलने मुंबई पब्लिक स्कूलचा 50-30 असा, तर विनोबा भावे शाळेने सनराईज हायस्कूलचा 40-14 असा पराभव केला.