पित्याकडून लेकीच्या सासरच्यांना तगडी भेट, सोशल मीडियावर तुफान चर्चा

एका नववधूला तिच्या वडिलांनी पाठवलेल्या भेटवस्तू सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. लेकीचा लग्नानंतरचा पहिला आषाढ महिना खास ठरावा, यासाठी तिला तगडय़ा भेटवस्तू पाठवण्यात आल्या आहेत. यात एक हजार किलो मासे, एक हजार किलो भाजीपाला, 250 किलो मिठाई, 250 किलो किराणा, 250 डब्बे लोणचे, 250 किलो झिंगा, 50 किलो चिकन, 10 बकऱया यांचा समावेश आहे.

आंध्र प्रदेशातील राजमुंदरी येथील व्यावसायिक बतुला बलराम कृष्णा यांची मुलगी प्रत्युषाचा विवाह यनम येथील पवन कुमार याच्याशी नुकताच झाला. आंध्र प्रदेशात आषाढ महिन्याला पवित्र मानले जाते आणि या महिन्यात मुलीच्या माहेरून सासरी भेटवस्तू पाठवण्याची प्रथा आहे. म्हणूनच बतुला बलराम कृष्णा यांनी लेकीच्या सासरी वजनदार वस्तू पाठवल्या आहेत. प्रत्युषाचा पहिला आषाढ मास संस्मरणीय ठरावा म्हणून बतुला बलराम यांनी तिला ही खास भेट दिली आहे. या भेटवस्तूंचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या