
हौसेला मोल नसते म्हणतात ते उगीच नाही. आंध्र प्रदेशात एका व्यक्तीने गाडीच्या नंबरप्लेटसाठी तब्बल दोन कोटी रुपये मोजले आहेत. ‘001’ असा प्लेटचा नंबर आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिह्यातील किरण कोल्पाकुला यांनी ही नंबरप्लेट खरेदी केली आहे. ऑटो लिलाव प्लॅटफॉर्मच्या लाँचिंगदरम्यान हा लिलाव झाला आहे. ही नंबरप्लेट पूर्वी एका लक्झरी कार कंपनीच्या संस्थापकाची होती. बोली इतक्या वेगाने झाली की, सर्व जुने रेकॉर्ड मोडीत निघाले. ही संख्या जुनी आणि अत्यंत दुर्मिळ मानली जाते. याआधी सर्वात महागडी नंबरप्लेट 1 कोटी 17 लाखांना विकली गेली होती.




























































