Video – अंगारकी चतुर्थीला भाविकांना घेता येणार सिद्धीविनायकाचे ऑनलाईन दर्शन

अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने गणेशभक्तांना 24 तास ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था केली आहे. कोविड-19 संसर्ग निर्बंध नियमावली नुसार गणेशभक्तांनी मंदिरात प्रवेश न करता घरातूनच श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यावं, अशी विनंती श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष, (राज्यमंत्री दर्जा) आदेश बांदेकर यांनी केली आहे. श्री सिद्धिविनायक टेम्पल अ‍ॅप डाउलोड करून घरातूनच श्रींच्या दर्शनाचा व आरतीचा लाभ घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या