न्यायालयाचे आदेश असतानाही पगारवाढ आणि प्रलंबित मागण्यांसाठी तीन दिवस आंदोलन करूनही कोणतीही दखल न घेणाऱया मिंधे सरकारविरोधात आशा सेविका आणि आरोग्य सेविकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. त्यामुळे आशा-आरोग्य सेविकांचे आंदोलन पेटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आशा सेविका आणि आरोग्य सेविकांच्या पगारवाढीसह अनेक मागण्यांसाठी वारंवार आंदोलने करूनही सरकार कोणतीही दखल घेत नाही. मार्चमध्ये झालेल्या आंदोलनानंतर खुद्द मुख्यमंत्र्यांनी पगारवाढीचे आश्वासन दिले, मात्र याबाबत अद्याप कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे आशा-आरोग्य सेविकांनी मंगळवारपासून आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. स्वतः मुख्यमंत्री चर्चा करून मागण्या मान्य करीत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आशा-आरोग्य सेविकांकडून देण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष प्रकाश देवदास यांनी दिली.
z आशा सेविकांना सहा हजार रुपये वेतन, दर महिन्याला 1 ते 10 तारखेदरम्यान वेतन मिळावे, आरोग्य सेविकांच्या रिक्त पदांवर आशा सेविकांची नियुक्ती करावी अशा त्यांच्या मागण्या आहेत.