
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर वन्य जीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका परदेशी नागरिकाला ताब्यात घेण्यात आले. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) ही कारवाई केली आहे. बँकॉकला जाणाऱ्या एका प्रवाशाच्या हँडबॅगची तपासणी केली असता त्या बॅगेत प्राण्यांची शिंगे आढळून आली. जप्त केलेल्या शिंगांसह आरोपीला पुढील कारवाईसाठी वन्य जीव संरक्षण प्राधिकरणाकडे सुपूर्द करण्यात आले.





























































