सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी व सूरज चव्हाण यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीकेचे बाण सोडताच अमोल मिटकरी आणि सूरज चव्हाण त्याला उत्तर देत आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा अंजली दमानिया यांनी थेट अजित पवार यांना आव्हान दिले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर)वर त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत अजित पवार गटाचा चांगलाच समाचार घेतला.
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या दोन विद्वान प्रवक्त्यांना आणि त्यांच्या मालकांना म्हणजे अजित पवारांना माझे आव्हान pic.twitter.com/ugHcht14Cx
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) August 11, 2024
काही दिवसांपूर्वीच अंजली दमानिया यांनी अजित पवार गटाचा खरपूस समाचार घेणारी पोस्ट केली होती. ‘गुलाबी जैकेट घालून, गुलाबी गाड्या आणि बसेस फिरवून, जन सन्मान होत नसतो. त्या जनतेने कष्टाने कमावलेल्या पैशातून भरलेल्या काराचा अपव्यय न कारणे, भ्रष्टाचार ना कारणे हा हाईल जनतेचा खरा सन्मान. तो तुमच्यांनी या जन्मी शक्य होणार नाही. केवळ गुलाबी जैकेट घालून वल्याचा वाल्मिकी होत नसतो’, अशा शब्दात दमानिया यांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता.
या टीकेमुळे सैरभैर झालेल्या अजित पवार गटाच्या सूरज चव्हाण यांनी अंजली दमानिया यांना ‘रिचार्जवर चालणारी बाई’ असे म्हटले होते. तसेच त्यांचे उत्पन्न काय आहे? वर्षातून दोन वेळा विदेश सहली कशा होतात? असा सवाल करत 8 तारखेला ईडीमध्ये त्यांच्या नवऱ्याविरोधात तक्रार दाखल झाली आहे. त्या गोरगरीब जनतेची जमीन बिल्डरच्या घशात घालतात. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, असा आरोप सूरज चव्हाण यांनी केला केला होता. या आरोपांना अंजली दमानिया यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मि.स्वयंघोषित समाजसेविका अंजली दमानिया
तुम्ही कीती तत्वनिष्ठ आहात हे आरश्या समोर उभे राहून स्वतःला विचारा..
तुम्हीची तत्व योग्यवेळी इतकी चांगली “मॅनेज” होतात कि कुटुंब दरवर्षी दोन फॉरेन ट्रिप करते.
तुमच्या तत्वाचा एक नमूना पाठवता…बाकीचे “मॅनेज” व्हिडीओ योग्य वेळी बाहेर येतील. pic.twitter.com/81Fnfgw8Cm— Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan) August 10, 2024
‘मी टीका केल्यावर अजित पवारांचे प्रवक्ते अमोल मिटकरी आणि सूरज चव्हाण तोंडाला येईल ते बोलतात. त्यामुळे तळपायाची आग मस्तकाला जाते. पण चव्हाण आणि मिटकरी सारख्या लोकांच्या डिक्शनरीमध्ये सिद्धांत, तत्व आणि देशसेवा हे शब्द नाहीत. अजित पवारांनीही ते शिकवले नाहीत’, असा टोला अंजली दमानिया यांनी लगावला.
‘मी विदेशात जाते आणि नवऱ्याच्या पैशाने, कर भरलेल्या पैशाने जाते. अजित पवारांची संपत्ती माझ्यापेक्षा एक हजारपट जास्त असेल, पण त्यांच्यापेक्षा जास्त कर मी भरत असेल. 17 तारखेला परत येतेय. परत आल्यावर हिंमत असेल तर तुमच्या मालकाला पाठवा. त्यावेळी मी आणि तुमच्या मालकाने आपली संपत्ती दाखवावी. एकदाचे होऊन जाऊ द्या’, असे थेट आव्हान अंजली दमानिय यांनी दिले.