अंकिताचा सनसनाटी विजय; माजी यूएस ओपन चॅम्प स्टोसूरला हरवले

सामना ऑनलाईन । एनिंग (चीन)

हिंदुस्थानची अनुभवी टेनिसपटू अंकिता रैना हिने बुधवारी आपल्या कारकीर्दीतील सर्वात मोठा विजय मिळवला. तिने 2011 साली यूएस ओपन (अमेरिकन) जिंकणाऱया समांथा स्टोसूरला एनिंग, चीन येथे सुरू असलेल्या डब्ल्यूटीए स्पर्धेत पराभवाचा धक्का दिला. अंकिता रैना हिने समांथा स्टोसूरला 7-5, 2-6, 7-5 अशा फरकाने पराभूत करीत आगेकूच केले. जागतिक रँकिंगमध्ये 180 व्या स्थानावर असलेल्या अंकिता रैनाने 2 तास व 50 मिनिटांमध्ये विजय मिळवला हे विशेष. अंकिता रैना हिने इस्तांबूल ओपनमध्ये उपविजेतेपद पटकावले होते.