
सामना प्रतिनिधी । नगर
शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, देश त्यांचे बलिदान विसरणार नाही. त्यांच्या बलिदानाचा बदला देशातील जनता नक्कीच घेईल, असा मला विश्वास आहे. मला वयोमानानुसार हत्यार पेलणार नाही पण माझी गरज पडली तर मीही तयार आहे, अशा शब्दात अण्णा हजारे यांनी शुक्रवारी प्रसार माध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
गेल्या दोन दिवसापासून अण्णा हजारे नगर येथे रुग्णालयात उपचार घेत आहेत. काल काश्मीर येथे झालेल्या घटनेच्या संदर्भात घटनेच्या संदर्भात प्रतिक्रिया दिली.
अण्णा हजारे म्हणाले, जे जवान शहीद झाले आहेत, त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. देशातील जनता तसे होऊ देणार नाही. जे शहीद झाले त्यांना आत्मशांती मिळते. भगवत गितेच्या संदेशातच असे म्हटले आहे. जी माणसे अशा प्रकारचे ध्येय ठेवतात अशांना मोक्ष मिळतोच असे ते म्हणाले.

































































