Anna Hazare- मोदी सरकारने 4 वर्षांत काही केले नाही, अण्णांचा हल्लाबोल

35

सामना प्रतिनिधी । नगर

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आजपासून उपोषणाचा इशारा दिला असून सकाळपासून ते राळेगणसिद्धी येथे उपोषण करणार आहेत. अण्णांनी उपोषण करू नये यासाठी राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेणार असून त्याची समजूत काढणार आहेत. मात्र अण्णा आपल्या उपोषणावर ठाम आहेत. पाच वर्षाच्या काळात मोदी सरकारने काही केले नाही, असा हल्लाबोल अण्णा हजारे यांनी केला आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज सकाळी यादव मंदिरामध्ये यादव बाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर समस्त गावकरी हे या ठिकाणी एकत्र आले. गावामधून रॅली काढून अण्णांनी आता उपोषणास सुरुवात केली. यावेळी ग्रामस्थांनी आपले व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या