हे सरकार आहे की वाण्याचं दुकान! अण्णांचा मोदी सरकारवर निशाणा

22
anna-hazare

सामना प्रतिनिधी । नगर

सरकारने अद्यापि लोकायुक्त न नेमल्यामुळे येत्या 30 जानेवारीला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे उपोषणास बसणार आहेत. त्यांनी वारंवार पत्रव्यवहार करूनही केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने त्याची दखल न घेतल्यामुळे अण्णांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. याबाबत बोलताना, ‘हे सरकार आहे की वाण्याचं दुकान’, असा टोला हाणत अण्णांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

जनलोकपाल बिल पास झाल्यानंतर 5 वर्षे होऊनही सरकारकडून अद्यापि लोकायुक्त नेमले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने सरकारला अनेकदा लोकायुक्त नेमण्यासाठी आदेश देऊनही सरकार त्याला दाद देत नाही, असे अण्णा म्हणाले. अण्णा म्हणाले, लोकपाल लोकायुक्त एवढा महत्त्वाचा कायदा असूनही सरकार टाळाटाळ करीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या