अॅण्टॉप हिलमध्ये मुलाची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अॅण्टॉप हिल येथे राहणाऱ्या एका 12 वर्षांच्या मुलाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. तो मुलगा सहाव्या इयत्तेत शिकत होता. त्याने आत्महत्या का केली ते समजू शकले नाही. अॅण्टॉप हिलमध्ये हा मुलगा पालकांसोबत राहत होता. बुधवारी रात्री अकराच्या सुमारास तो घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. अॅण्टॉप हिल पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करून अधिक तपास सुरू केला आहे.