अनुप जलोटा आणि जसलीनचा व्हिडीओ व्हायरल, चाहत्यांनी पुन्हा केले ट्रोल

2030

प्रसिद्ध भजन गायक अनुप जलोटा यांनी बिग बॉसच्या घरात त्यांची शिष्या जसलीन मथारूसोबत प्रवेश केला होता. बिग बॉसच्या घरात एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या या दोघांनी घराबाहेर आल्यानंतर मात्र त्यांचे नाते फक्त गुरु शिष्याचे असल्याचा दावा केला होता. मात्र आता या दोघांचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा अनुप जलोटा यांना ट्रोल केले आहे.


View this post on Instagram

Aap yaha aaye kis liye?? @jalotaanup #tiktok @indiatiktok

A post shared by Jasleen Matharu (@jasleenmatharu) on

अनुप जलोटा हे जसलीन मथारूसोबत बिग बॉस सिझन 12 मध्ये दिसले होते. त्यावेळी त्यांनी जसलीन ही त्यांची शिष्या तसेच प्रेयसी असल्याचे सांगितलेले. जसलीन जलोटा यांच्यापेक्षा 37 वर्षांनी लहान आहे. त्यामुळे जलोटा यांना 65 व्या वर्षी लॉटरी लागल्याचे बोलत होते. त्यांना यावरून ट्रोलही करण्यात आले होते. मात्र बिग बॉसच्या घरात प्यार किया तो डरना क्या म्हणणाऱ्या जलोटा यांनी बाहेर पडताच युटर्न घेतला व जसलीन त्यांची फक्त शिष्या असल्याचे म्हटले होते.

आपली प्रतिक्रिया द्या