विराट कोहलीसाठी पत्नी अनुष्काने शेअर केली खास पोस्ट, म्हणाली देव सर्वोत्तम लेखक

विराट कोहलीवर त्याच्या चांगल्या खेळीमुळे सध्या चहूबाजूने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. बुधवारी विराट कोहलीने हिंदुस्थान विरुद्ध न्यूझिलंडच्या उपांत्यफेरीमध्ये 50 वे शतक मारले. आंतरराष्ट्रीय सामन्यातील त्याचे हे तिसरे शतक आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. एवढेच नाही तर त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माच्या आनंदाला पारा उरला नाही आणि तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या नवऱ्य़ाच्या यशाबाबत भावना व्यक्त केल्या आहेत.

बुधवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हिंदुस्थान विरुद्ध न्यूझीलंडच्या उपांत्य सामन्यात विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रम मोडीत काढला आहे. उपांत्य फेरी पाहण्यासाठी विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मानेही उपस्थिती लावली होती. विराटच्या या यशाबाबत अनुष्का प्रचंड खुश आहे. त्यासाठी अनुष्काने विराटसाठी इंस्टाग्रामवर स्टोरीवर खास पोस्ट शेअर करुन विराटला प्रोत्साहन दिले आहे. एवढेच नाही तर क्रिकेटर पतीला तिचं गॉड चाईल्ड म्हटलं आहे. अनुष्काने लिहिले, ‘देव सर्वोत्तम लेखक आहे! देव सर्वोत्तम लेखक आहे, मी देवाचे मनापासून आभारी आहे. ज्याने मला प्रेम आणि भरभरुन आशिर्वाद दिले आहेत.  तुला दिवसेंदिवस मजबूत होताना आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होताना मला बघता आलं आणि तुला यश दिले. तू कायम स्वतःशी आणि खेळाशी प्रामाणिक राहीलास. तू खरोखरच देवाचा मुलगा आहेस. एवढेच नाही तर अनुष्काने आणखी एक पोस्ट शेअर करत हिंदुस्थान संघाचे कौतुक करत ही बंदूक टीम असल्याचा उल्लेख केला आहे.

anushka sharma post for virat kohli

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली पुन्हा आई-बाबा होणार आहेत. अनुष्का दुसऱ्यांदा प्रेग्नेंट आहे. आपल्या दुसऱ्या प्रेग्नेंसीमुळे ती फार चर्चेत आली होती. मात्र दोघांनीही अनुष्का याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही