गरोदरपणातही अनुष्का करतेय शूटिंग

आयपीएलसाठी पती विराट कोहलीसोबत दुबईला गेलेली अभिनेत्री अनुष्का शर्मा नुकतीच मुंबईत परतली आहे. अनुष्का सध्या सात महिन्यांची गरोदर असून जानेवारी महिन्यात ती आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.

गरोदरपणातही आराम न करता ती आपल्या कामाला प्राधान्य देताना दिसतेय. नुकताच सेटवर मेकअप करतानाचा फोटो तिने आपल्या इन्स्टा स्टोरीवर अपलोड केला आहे. त्यासोबत तिने हाय असे कॅप्शन दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या ब्रॅण्ड कमिटमेंटसाठी अनुष्का या आठवडय़ात बॅक टू बॅक शूटिंग करणार आहे. ऑगस्ट महिन्यात विराट आणि अनुष्का यांनी आपण आई बाबा होणार असल्याची गुड न्यूज शेयर केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या