अनुष्का शर्मा आता टीम इंडियात, क्रिकेटचे घेणार धडे

932

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याची पत्नी अनुष्का शर्मा लवकरच टीम इंडियात दाखल होणार आहे. अनुष्का ही प्रसिद्ध महिला गोलंदाज झुलन गोस्वामीची भूमिका साकारणार आहे. त्यासाठी लवकरच ती क्रिकेटचे धडे घेणार आहे. यात विराट देखील तिला मदत करणार असल्याचे समजते.


View this post on Instagram

Gazing at 2020

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

बॉलिवुडमध्ये आतापर्यंत बऱ्याच खेळाडुंचे बायोपिक बनले आहेत. एमएस धोनी, मेरी कोम, मिल्खा सिंग, संदीप सिंग यांच्या जीवनावर बायोपिक आले असून या सर्व चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. स्पोर्ट्स बायोपिकचा हा ट्रेंड सुरूच असून लवकरच टीम इंडियाच्या महिला संघाची यशस्वी गोलंदाज व जगातील सर्वात जलद महिला गोलंदाज झुलन गोस्वामी हिच्या जीवनावर चित्रपट येणार आहे. या चित्रपटातच अनुष्का शर्मा ही झुलनच्या भूमिकेत दिसणार आहे.

37 वर्षाच्या झुलनने 2002 मध्ये हिंदुस्थानच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ती टीम इंडियाची सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. तिने हिंदुस्थानासाठी 10 कसोटी, 182 एकदिवसीय, 68 टी20 सामने खेळले आहेत. झुलन हिने एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा घेतल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या