जम्मू-कश्मीरात देशातील कोणत्याही नागरिकाला जमीन खरेदी करता येणार

जम्मू-कश्मीरात आता कोणत्याही हिंदुस्थानी नागरिकाला जमीन खरेदी करता येणार आहे. केंद्र सरकारने पूर्वीचा कायदा रद्द करून हा महत्त्वपूर्ण अध्यादेश जारी केला आहे.

गेल्या वर्षी जम्मू-कश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 आणि 35-ए केंद्र सरकारने हटविले आणि जम्मू-कश्मीर व लेह-लडाख असे अशा दोन केंद्रशासित प्रदेशात आता देशातील कोणत्याही नागरिकास जमीन खरेदी करता येईल. तेथे राहता येईल.

उद्योग-व्यवसाय त्या जमिनीवर उभारता येणार आहेत. दरम्यान, जम्मू-कश्मीरात उद्योग यावेत, रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, अशी यामागची भूमिका आहे. औद्योगिक गुंतवणूक, पर्यटन यामुळे वाढेल. मात्र, शेतजमीन राज्यातील लोकांकडेच राहील, अशी माहिती उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिली.

दरम्यान, लेह-लडाखबाबत केंद्र सरकार स्वतंत्रपणे निर्णय घेणार आहे. यापूर्वी जम्मू-कश्मीरात जन्मलेल्या नागरिकालाच तेथे जमीन, घर खरेदी करता येत होते.

आपली प्रतिक्रिया द्या