कोरोना लढ्यासाठी अपना बँकेने दिला 40 लाखांचा निधी

443

जगावर आलेले कोविड 19 संकटाचा सामना करण्यासाठी अपना बँकेने आपला खारीचा वाटा उचलला आहे. कर्ली गावचे सुपुञ व अपना बँकेचे अध्यक्ष दत्ताराम चाळके यांनी अपना बँकेेतर्फे एकुण 40 लाखाचा निधी दिला आहे,  तसेच संगमेश्वर तालुका विलगीकरण सेंटरसाठी 500 मास्क, 200 चादरी आणि 200 सतरंज्या दिल्या आहेत.

दत्ताराम चाळके हे Nafcub दिल्लीचे संचालक व अपना बॅंकेचे अध्यक्ष आहेत. गिरणी कामगारांनी एकञ येवून सुरु केलेली अपना बँक राज्याच्या आपत्तीच्या काळात नेहमीच आपला मदतीचा हात पुढे करत आलेली आहे. कोरोना महामारीच्या आपत्तीसाठी मदत म्हणुन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अपना बँकेने 25 लाख दिले. अपना बँकेच्या 85 शाखांतील कर्मचारी वर्गाने आपले एक दिवसाचे वेतन रुपये10 लाख दिले, तसेच पंतप्रधान निधीसाठी बँकेने 5 लाख असे एकुण 40 लाख रुपये दिले.

संगमेश्वर तालुक्यातील तीन विलगीकरण कक्षासाठी या बँकेने 500 मास्क, 200 चादरी, 200 सतरंज्या तहसीलदार सुहास थोरात यांचेकडे जमा केल्या. यावेळी प्रांताधिकारी सुर्यवंशी, अपना बँक देवरुख शाखाध्यक्ष संतोष केसरकर, गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर व आकारचे  निलेश चव्हाण आदी उपस्थित होते. बॅंकेने आधार दिलेल्या देवरुखमधील महिलाबचत गटांकडुनच 500 मास्क शिवुन घेतले गेले. या मदतीसाठी तहसीलदारांनी शासनातर्फे अपना बँकेचे विशेष आभार मानले.

आपली प्रतिक्रिया द्या