
आयसीसी टी-20 वर्ल्डकप सुरू होण्यास अवघे दोन दिवस बाकी आहेत. यंदा हिंदुस्थान आणि श्रीलंकेत ही स्पर्धा होत आहे. हिंदुस्थानचा संघ 7 फेब्रुवारीला यूएसए विरुद्ध आपला सलामीचा सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर खेळेल. क्रिकेटच्या या महाकुंभाकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असतानाच हिंदुस्थानी क्रिकेट संघाचे मुख्य प्रायोजक अपोलो टायर्सने ‘Har Safar Mein Dum Hai’ ही नवी जाहिरात मोहीम लॉन्च केली आहे. या मोहिमेत क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांच्यासह विराट कोहली, रोहित शर्मा, के.एल. राहुल, शुभमन गिल आणि अर्शदीप सिंग हे प्रमुख खेळाडू दिसणार आहेत.
प्रसिद्ध दिग्दर्शक अभिनय देओ यांनी दिग्दर्शित केलेली ही फिल्म ए.आर. रहमान यांच्या ‘मा तुझे सलाम’ या अजरामर गीतावर आधारित आहे. यामध्ये खेळाडूंच्या बालपणापासून हिंदुस्थानी जर्सी मिळेपर्यंतचा खडतर प्रवास, त्यांचे कष्ट आणि कुटुंबाचा पाठिंबा यांचे भावनिक चित्रण करण्यात आले आहे.
ICC T20 WC 2026 – डिव्हिलियर्सने निवडले ‘टॉप-4’ संघ; बलाढ्य ऑस्ट्रेलियाला डच्चू!




























































