अ‍ॅपल ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका, कंपनीने वॉरंटी पॉलिसीत केला मोठा बदल

हल्ली तरुणांमध्ये अ‍ॅपल कंपनीच्या आयफोनचे क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. हजारो लाखोंच्या किंमतीत असलेल्या या फोनला जगभरातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र या जगप्रसिद्ध कंपनीने अचानक त्यांच्या पॉलिसीमध्ये एक मोठा बदल केला असून त्यामुळे आता ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार आहे.

अ‍ॅपल कंपनी ही आतापर्यंत त्यांच्या ग्राहकांना वॉरंटीमध्ये ‘सिंगल हेअरलाइन क्रॅक’ असेल तर त्यासाठी पैसे घेत नव्हती. कंपनीच्या स्टँडर्ड वॉरंटी नियमांनुसार सिंगल हेअरलाइन क्रॅक’ कंपनीला पैसे न घेता रिपेअर करून देणे बंधनकारक होते.

जर कोणत्याही प्रकारचा फिजीकल डॅमेज नसेल तर अ‍ॅपलच्या सर्व प्रोडक्ट्सवर ही वॉरंटी मिळत होती. मात्र आता अ‍ॅपलने iPhone व Apple Watch च्या वॉरंटी नियमात बदल केला आहे. त्यामुळे आता ग्रहाकांना सिंगल हेअरलाईन क्रॅकसाठी देखील पैसे भरावे लागणार आहेत. आता सिंगल हेअरलाईन क्रॅक देखील अ‍ॅक्सिडेंटल डॅमेज अंतर्गत रिपेअर केली जाणार आहे.