अ‍ॅपलने नोएडात पाचवे स्टोअर उघडले

अ‍ॅपल कंपनीने हिंदुस्थानवर चांगलाच फोकस केला असून कंपनीने आता हिंदुस्थानातील पाचवे स्टोअर नोएडात उघडले आहे. नोएडा येथील डीएलएफ मॉल ऑफ इंडियामध्ये हे स्टोअर उघडण्यात आले आहे. त्यामुळे दिल्ली एनसीआरमधील हे अ‍ॅपलचे दुसरे स्टोअर आहे. याआधी दिल्लीत 2023 मध्ये पहिले स्टोअर उघडण्यात आले होते. मुंबई, बंगळुरू आणि पुण्यात अ‍ॅपलचे स्टोअर आहे. हिंदुस्थानात मुंबई-दिल्ली व्यतिरिक्त आणखी चार स्टोअर्स उघडण्याची कंपनीची योजना आहे, असे अ‍ॅपलचे सीईओ टीम कुक यांनी सांगितले. नोएडा स्टोअरमध्ये आयफोन 17 सिरीज, एम5-पॉवर्ड मॅकबुक प्रो आणि 14 मॅकबुक प्रो सारखी नवीन उत्पादने मिळतील.