
स्टीव्ह जॉब्ज आणि स्टीव्ह व्होजनियाक यांनी 1976 साली ऍपल कंपनीची स्थापना केली. त्याचवर्षी स्टीव्ह जॉब्ज आणि स्टीव्ह व्होजनियाक यांनी रेयर फुली फंक्शनल ऍपल 1 कम्प्युटर बनवला. या कम्प्युटरचा बोस्टन येथे लिलाव होणार आहे. त्याची लिलावाची सुरुवातीची बोली 3 कोटी 39 लाख रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. ऍपल कंपनीचे हे पहिले उत्पादन आहे. पहिल्या वर्षी या कम्प्युटरचे 200 युनिट तयार करण्यात आले होते. त्यापैकी स्टीव्ह व्होजनियाकने 175 युनिटची विक्री केली होती. त्या वेळी ऍपल 1 ची किंमत 666 डॉलर्स एवढी होती. आजच्या हिशेबात ती 46 हजार रुपये एवढी होती. या लिलावात ऍपलचे लाईफटाईम कलेक्शन प्रोडक्टही ठेवण्यात आले आहेत.























































