
अॅपलचे वार्षिक डेव्हलपर संमेलन 9 जून रोजी सुरू होणार आहे. हे संमेलन 13 जून 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. या संमेलनामध्ये नवीन ऑपरेटिंग सिस्टम आयओएस 19 किंवा आयओएस 26 संबंधी माहिती दिली जाऊ शकते. आयओएस 18 नंतर 19 ऐवजी आयओएस 26 आणले जाऊ शकते. आयपॅड, मॅकबुक, स्मार्टवॉच, व्हीजन आदींसाठी ओएस 26 चा सपोर्ट मिळू शकतो.