

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील ही ईशा भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा गोरे लग्नबंधनात अडकली आहे.

अपूर्वाने अंशुमन जोशी याच्यासोबत लग्नगाठ बांधली. अपूर्वाने स्वत: सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत .

अपूर्वाने लग्नात गर्द हिरव्या रंगाचा शालू नेसला असून अंशुमनेन सफेद रंगाचा कुर्ता व पिवळ्या रंगाचे धोतर नेसले होते. अपूर्वाने लग्नात अगदी मराठमोळा साज शृंगार केला होता.


























































