देशी व्हॉट्सअ‍ॅप झाला फ्लॉप, ‘अरट्टाई’ अ‍ॅपचे रँकिंग घसरले

व्हॉट्सअ‍ॅपला पर्याय म्हणून ‘अरट्टाई’ नावाचे स्वदेशी अ‍ॅप लाँच करण्यात आले होते. अ‍ॅप लाँच झाल्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्याने गुगल प्ले स्टोरवर टॉपचे रँकिंग मिळवले. अवघ्या काही दिवसांत ‘अरट्टाई’ने व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर दिली. दिवसाला अंदाजे तीन हजार इतके साईन अप्स होऊ लागले. ही संख्या तीन लाखांपर्यंत पोचली होती. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. अ‍ॅपची लोकप्रियता घसरली आहे. पहिल्या क्रमांकावर असलेला ‘अरट्टाई’ आता गुगल प्ले स्टोरच्या टॉप फ्री कम्युनिकेशन अ‍ॅपच्या यादीत सातव्या स्थानावर आला आहे तर अ‍ॅपल अ‍ॅप स्टोरवर सहाव्या स्थानी आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर मात्र ‘अरट्टाई’ ने आपली जागा मजबूत ठेवली आहे.

सिक्युरिटी फीचरची उणीव

‘अरट्टाई’ अ‍ॅपकडे लोकांनी पाठ फिरवली, यामागे काही प्रमुख कारणे आहेत. सर्वात मोठे कारण म्हणजे सिक्युरिटी फीचरमध्ये कमतरता. अनेक युजर्स अ‍ॅपच्या टेक्स्ट मेसेजसाठी एंड टू एंड एक्रिप्शनची मागणी करत आहेत, ते अद्याप झालेले नाही. व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंगमध्ये सुरक्षा फीचर आधीपासूनच आहे. मात्र चॅटिंगबद्दल युजर्सला तेवढा विश्वास वाटत नाही. आगामी काळातील अपडेट्समध्ये हे फीचर जोडले जाईल, असे कंपनीतर्फे सांगण्यात आलेले आहे.