अर्चना पुरन सिंगची मोलकरीण बनली स्टार!

10195

सोशल मीडियावर कलाकार नेहमीच चर्चेत असतात. आता कलाकारांचे नोकर देखील भाव खावून जाताना दिसत आहेत. सध्या अभिनेत्री अर्चना पुरन सिंगची मोलकरीण भाग्यश्री सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली असून तिचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

लॉकडाऊन दरम्यान अर्चना अधूनमधून भाग्यश्री हिचे व्हिडिओ शेयर करीत असून ते व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत आहेत. नुकताच अर्चनाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात भाग्यश्रीवर छापून आलेले आर्टिकल पाहून ‘तू स्टार झालीस’ असे अर्चना तिला म्हणत आहे. त्यावर निरागसपणे ‘मला वेड लागेल’ असे म्हणताना भाग्यश्री दिसत आहे. ‘भाग्यश्री रॉक्स. जेव्हा तिला कळले कि ती स्टार बनली आहे’ असे कॅप्शन अर्चना हिने व्हिडिओला दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या