अर्जेंटिना, चिली उपांत्यपूर्व फेरीत

अर्जेंटिना व चिली या दोन देशांनी कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. अर्जेंटिनाने मंगळवारी पहाटे झालेल्या लढतीत अॅलेक्झॅण्ड्रो गोमेजने केलेल्या गोलच्या जोरावर पॅराग्वेला 1-0 असे पराभूत केले. अर्जेंटिनाचा ए गटामधील हा दुसरा विजय ठरला. या संघाने तीन सामन्यांमधून सात गुणांची कमाई करीत आगेकूच केली. या गटामधून अर्जेंटिनासह चिली या देशानेही पुढल्या फेरीत एण्ट्री मारली. चिली-उरुग्वे यांच्यात 1-1 अशी बरोबरी झाली. पण चिलीने पाच गुणांसह पुढे वाटचाल केली.

अजून दोन संघांना संधी

ए गटामधून अर्जेंटिना व चिली या देशांनी पुढे पाऊल टाकले असले तरी या गटामधून आणखी दोन देशांना उपांत्यपूर्व फेरीत जाण्याची संधी असणार आहे. कारण एका गटामधून चार संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणार आहेत. या गटात पॅराग्वे संघाने आतापर्यंत तीन गुणांची कमाई केलीय. उरुग्वेला एकच गुण कमवता आलाय. बोलिवियाला दोन सामन्यांनंतरही अजून गुणांचे खाते उघडता आलेले नाही.

 

अर्जेंटिनापॅराग्वे लढतीची आकडेवारी

      अर्जेंटिना   पॅराग्वे

गोल     1    0

शॉट      8   10

शॉट ऑन टार्गेट 4     2

बॉलवरील ताबा 43   57

ऑफसाईड    1  2

कॉर्नर्स   2    9

यलो कार्ड     1  2

रेड कार्ड 0    0

बी गटात ब्राझील सरस

बी गटात यजमान ब्राझीलने दोन सामन्यांमध्ये विजय मिळवत सहा गुणांची कमाई केलीय. कोलंबियाचा संघ चार गुणांसह दुसऱया स्थानावर विराजमान आहे. पेरूचा संघ तीन गुणांसह तिसऱया व वेनेझुएलाचा संघ दोन गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. इक्वेडोरला फक्त एकच गुणाची कमाई करता आलीय. हा संघ तळाला आहे.

मेस्सीचा विक्रम

लियोनेल मेस्सीने पॅराग्वेविरुद्धच्या लढतीत नवा विक्रम आपल्या नावावर केला. अर्जेंटिनासाठी त्याने 147वा सामना खेळला. झेवियर मॅसचेरानो याने अर्जेंटिनासाठी सर्वाधिक 147 सामने खेळले आहेत. लियोनेल मेस्सीने या विक्रमाची बरोबरी केली. आता पुढील लढतीत लियोनेल मेस्सी हा विक्रम मोडीत काढील यात शंका नाही.

आपली प्रतिक्रिया द्या