यशस्वी, अर्जुन मुंबईच्या संघात

811

हिंदुस्थानच्या 19 वर्षांखालील संघाचा सदस्य यशस्वी जैसवाल व सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याची मुंबईच्या 23 वर्षांखालील क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे. सी. के. नायडू ट्रॉफीमधील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीसाठी ही निवड करण्यात आली आहे. मुंबईसमोर बाद फेरीच्या लढतीत पुद्दुचेरीचे आव्हान असणार आहे. ही लढत 22 ते 25 फेब्रुवारी या कालावधीत रंगेल.

हार्दिक तामोरेच्या खांद्यावर मुंबई संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या संघात स्टार खेळाडूंचा समावेश करण्यात आलाय. यामध्ये यशस्वी जैसवाल, अर्जुन तेंडुलकर यांच्यासमवेत सरफराज खान, तनुश कोटीयन व मिनाद मांजरेकर यांचाही समावेश करण्यात आला आहे.

मुंबईचा चमू खालीलप्रमाणे

हार्दिक तामोरे (कर्णधार), अमन खान, यशस्वी जैसवाल, सरफराज खान, अग्नी चोप्रा, चिन्मय सुतार, गौरीश जाधव, वैभव कळमकर, श्रेयस गुरव, तनुश कोटीयन, मिनाद मांजरेकर, अर्जुन तेंडुलकर, अंजदीप लाड, प्रशांत सोलंकी, साईराज पाटील.

आपली प्रतिक्रिया द्या