
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
कश्मीरमध्ये दगडफेक करणारे हे दहशतवादी संघटनेचे सक्रीय सदस्य आहेत, त्यांचा निपटारा करणे गरजेचे असल्याचे सेनेचे प्रमुख बिपीन रावत यांनी म्हटले आहे. तसेच इस्लामाबादने सीमा पार दहशतवादाला खतपाणी घालण्यास रोखले नाही तर हिंदुस्थानी सेना ‘इतर कारवाई’ करेल असा कडक इशारा त्यांनी यावेळी दिला. इन्फ्रेंट्री दिनानिमित्त पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी हे वक्त्यव्य केले. इतर कारवाई म्हणजे काय हे त्यांनी स्पष्ट केले नाही.
Pakistan is fully aware they can never succeed, terror is another way by them to keep the pot boiling. They want to stall development in Kashmir but Indian state is strong enough to counter everything, and we are fully capable of carrying out different ops: Army Chief Bipin Rawat pic.twitter.com/PZC28d4Nrn
— ANI (@ANI) October 27, 2018
जम्मू कश्मीरच्या अनंतनागमधील दगडफेकीत राजेंद्र सिंह या जवानाचा मृत्यू झाला होता. त्यावर रावत म्हणाले की, “हे दगडफेक दुसरे तिसरे कोणी नसून दहशतवादी संघटनेचे सक्रीय सदस्य आहेत. अशी दगडफेक करून जर ते लोकांना मारू शकतात तर ते दहशतवादाच्या मार्गावर आहेत.” अशी दगडफेक करून काही हाती लागणार नसल्याचे त्यांनी कश्मीरी तरुणांना उद्देशून सांगितले. तसेच यांच्याविरोधात कडक कारवाई करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले.
Jawan who lost his life after being attacked by stone pelters was guarding a border roads team which was constructing roads, and then we have some ppl saying don’t treat stone pelters like OGWs(over ground workers) of terrorists: Army Chief General Bipin Rawat pic.twitter.com/uQt2nYhZAw
— ANI (@ANI) October 27, 2018
पाकपुरस्कृत दहशतवादावर रावत म्हणाले की, “1971 साली झालेल्या युद्धात हिंदूस्थानकडून पाकिस्तान हरले होते, त्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानने छद्मी युद्ध सुरू केले आहे. जेणेकरून हिंदूस्थानी सैन्य यात गुरफूटून राहिल आणि जे गमावले आहे ते मिळवता येईल.” सीमेपलीकडून होणार्या घुसखोरीबद्दल राव म्हणाले की, “अशा कारवायांमुळे फक्त पाकिस्तानचे नुकसान आहे, अशा घुसखोरांना यमसदनी पाठवण्यात आम्ही सक्षम आहोत. जर पाकिस्तानने या कारवायांना खतपाणी घालण्यास नाही थांबवले तर आम्ही ‘इतर कारवाई’ करू.” तसेच “पाकिस्तान कश्मीर खोर्यात अशांतता पसरवत आहे, यात आपण कधीच सफल होणार नसल्याची पाकिस्तानला जाणीव असूनही ते खोर्यात कारवाया करत आहेत. जम्मू कश्मीर कायदेशीर पद्धतीने हिंदुस्थानचा भाग आहे. हा भूभाग बळकवण्यासाठी पाकिस्तानचे प्रयत्न सुरू आहे.” तसेच बांग्लादेश मुक्तीनंतर पूर्व पाकिस्तान गमावल्यानंतर पाकिस्तानने कश्मीरचा भूभाग गिळण्यासाठी प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.

























































