काही करू, दहशतवाद मोडून काढू, लष्करप्रमुख नरवणे यांचे उद्गार

310

जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटविण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हे ऐतिहासिक पाऊल आहे. या निर्णयामुळे कश्मीरातील जनतेला मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळेल, असे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी सांगितले. दरम्यान, दहशतवादावर ‘झीरो टॉलरन्स’ ही लष्कराची नीती आहे. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱयांना सडेतोड उत्तर दिले जाईल. दहशतवाद मोडून काढण्यासाठी आमच्याकडे अनेक पर्याय असून, त्याचा वापर करण्यास कदापि कचरणार नाही, असा इशाराही लष्करप्रमुखांनी नाव न घेता पाकिस्तानला दिला.

दिल्ली कॅण्टोन्मेंट येथे 72व्या लष्कर दिनाच्या कार्यक्रमात लष्करप्रमुख नरवणे बोलत होते. 370 कलम हटविणे हा ऐतिहासिक निर्णय आहे. जम्मू-कश्मीरातील जनतेला राष्ट्रीय मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे, असे सांगतानाच लष्करप्रमुख नरवणे यांनी नाव न घेता पाकिस्तानला फटकारले. दहशतवादाला खतपाणी घालणाऱयांविरुद्ध लढण्यासाठी आमच्याकडे अनेक पर्याय आहेत. ते पर्याय वापरण्यासाठी आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असे त्यांनी पाकिस्तानला बजावले. देशवासीयांच्या मनात लष्कराचे एक विशेष स्थान आहे. लष्करात जाती-धर्म-प्रांत असा कसलाही भेदभाव केला जात नाही, असेही लष्करप्रमुखांनी सांगितले.

दहशतवादाला खतपाणी घालणाऱयांना सडेतोड उत्तर देऊ!
आमचे जवान प्रत्येक आव्हानाला भिडण्यासाठी तसेच भविष्यातील युद्धासाठी तयार आहेत. लष्कराचे सायबर-स्पेशल ऑपरेशनवर काम सुरू आहे. जवानांना अत्याधुनिक शस्त्र्ाास्त्र्ाs पुरवली जाताहेत. या वर्षी लष्करामध्ये रायफलपासून क्षेपणास्त्र्ाांपर्यंत नवीन शस्त्र्ाास्त्र्ाs मिळतील, नवनवीन तंत्रज्ञानांचा समावेश केला जाणार आहे, असे लष्करप्रमुखांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या