एका जवानाला पोलिसांनी अटक केली आहे. या जवानाकडे मोठ्या प्रमाणात स्फोटकं आढळली आहेत. त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
बिहारच्या बेगुसरायमध्ये पोलिसांनी एका जवानाला अटक केली आहे. पोलिसांनी जवानाकडून 75 डीटोनेटर आणि 90 स्फोटकं जप्त केली आहेत. हा जवान ट्रेनमधून ही स्फोटकं घेऊन जात होता. तेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना खबर मिळाली की एक व्यक्ती मोठ्या प्रमाणात स्फोटकं घेऊन जात आहे. तेव्हा पोविसांनी लोहिया नगर पुलाजवळ तपास केला आणि एका व्यक्तीला अटक केली. अटक केलेल्या व्यक्तीचे नावर राज किशोर कुमार आहे. दीड वर्षापूर्वी कुमार सैन्यात भरती झाला होता. गेल्या तीन ते चार दिवसांपासून तो गावी रहायला आला होता.
कुमारची मणिपूरमध्ये पोस्टिंग होती. पोलिसांनी कुमारला अटक केली असून त्याची चौकशी सुरू केली आहे. कुमारवर आणखी काही आरोप किंवा गुन्हे आहेत का याचा पोलिस शोध घेत आहेत.