फेसबुक, इन्स्टाग्राम डीलिट करा, लष्कराचे जवानांना आदेश

फेसबुक, इन्स्टाग्राम, टिंडर, पबजीसह 89 ऍप्सवरून माहिती लिक होत असल्याने ती आपल्या मोबाईल फोनमधून तातडीने डीलिट करा असे आदेश लष्कराने जवानांना दिले आहेत.

या धोकादायक ऍप्समध्ये स्नॅपचॅट, ओकेक्युपिड, यूसी ब्राऊझर, बंबल, शेअरइट, झेंडर, हेलो, कॅमस्कॅनर, क्लब फॅक्टरी आदी ऍप्सचा समावेश आहे. लडाख सीमेवर चीनबरोबर सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 59 चीनी मोबाईल ऍप्सवर बंदी घातली. त्याच आधारे लष्कराने जवानांना हे आदेश दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या